श्रीक्षेत्र माळेगाव| महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेचे आणि लोककलेचे जतन करण्यासाठी व लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजीत पारंपारिक लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कामवार, चंद्रसेन पाटील, आनंदराव शिंदे, गट विकास अधिकारी आडेराघो आदींची उपस्थिती होती. श्री खंडोबाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा काठी आणि घोंगडी देवून सत्कार करण्यात आला. शाहीर प्रेमकुमार मस्के यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कारभारी दमानं… होऊ द्या दमानं, बाई मी लाडाची… कैरी पाडाची.. विविध लावण्या, खंडोबा गीत, वेस्टर्न, ग्रुप डान्स सादर केले. पांडुरंग मुळे नारायणगावकर तमाशा मंडळ मांजरवाडी या संचाने सादर केलेल्या चंद्रा व बाई मी लाडाची ग कैरी पाढाची या लावणी सादरणार रसिक थिरकले. यावेळी आनंद लोकनाट्य मंडळानी विविध लावण्यासह झुमकावाली पोरं … वन्स मोर ठरले. अजंली राजे नाशिककर, रघुवीर खेडकर, हिराभाऊ बडे व शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाम मंडळ नगरकर यांच्यासह विविध जिल्यातील कलाकारांनी लोककला मंचावर सादर केलेल्या. बहारदार गीतांने यावेळी रसिकांची मने जिंकली.

अनेक जिवंत लोककलेचे बहुरंगी दर्शन यानिमित्त राज्याच्या रसिक प्रेक्षकांना मिळाले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाखो रसिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम कौशल्ये यांनी केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. डी. चोरमले, पी.एम. वाघमारे, विस्तार अधिकारी डी.आय. गायकवाड, धनंजय देशपांडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची वैभवशाली परंपरा आहे. यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने प्रतिसाद आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले.

रमेश गीरी जीवनगौरवाने सन्मानित
माळेगाव येथे पारंपरिक लोककला महोत्सवात नांदेड येथील शाहीर – हस्य सम्राट रमेश गीरी यांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व पंचायत समितीचे सभापती आनंदराव शिंदे यांनी प्रत्येकी अकरा हजार रोख बक्षीस गीरी यांना दिले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version