
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या जुना मोंढा नवीन पूल ते सिडको लातूर फाटा दरम्यान मार्गाचे सिमेंट काॅक्रेटिकरण रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले, यासाठी सहा महिन्यांचा जवळपास कालावधी पूर्ण झाला,त्यानंतर दुभाजकावर विजेचे खांब उभारले परंतु ते अद्यापही पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असून सर्वत्र रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
गेल्या अनेक वर्षाच्या कालावधी नंतर जुना मोंढा नवीन पूल ते सिडको मार्गाचे चार पदरी रुंदीकरण करण्यात आले. या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्याला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुभाजकावर काही महिन्यांपूर्वी विजेचे खांब उभारण्यात आले यास सुमारे सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असावा,परंतु सदर खांबावर पथदिवे बसविण्यात आले नसून सर्वत्रअंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लुटमारीच्या घटनेत वाढ होण्याची शक्यता असून संबंधित विभागाने खांबावर पथदिवे बसवावेत अशी मागणी वाहन धारक व नागरिकांमधून होत आहे.
