
मुखेड/नांदेड। जिल्ह्यातील बिओटी तत्वावर देण्यात आलेले हडोळती,मुखेड,कहाळा,देगलुर,बिलोली टोल वर कल्याण टोल हायवे प्रा.लिमिटेड कडुन लुट होत असुन याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपुर्वक दुलर्क्ष करत असल्याने तात्काळ यावर पुरावे जोडत टोल वर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी निवेदनाद्वारे मुख्य अभियंता,नांदेड यांना केली.
कल्याण टोल कडुन लाईट मोटार व्हाईकल,मिडियम मोटार व्हाईकल वाहनाकडुन कमी टोल आकारणे गरजेचे असताना आरसी वर ट्रक व बस उल्लेख नसतानाही कल्याण टोल कडुन जबरदस्तीने वाहनधारकाकडुन ट्रक व बसचा दर वसुल करण्यात येत आहे. याकडे सार्वजनीक बांधकाम विभाग झोपेंचे सोंग घेत असताना दिसत असुन असे हजारो वाहन या टोल वरुन धावतात ना कुठले सुचनाफलक,ना फाँस्टटँग ची सुविधा नसुन फक्त टोल वसुली जोरात असल्याने दररोज लाखो रुपयाची अवैध वसुली होत असुन यांची तात्काळ चौकशी होवुन टोल वर कार्यवाही करुन वाहनधारकाना दिलासा द्यावा.
लोकलच्या पिकअप वाहनाना वेगळा दर व शेतकर्यांच्या वाहनाना वेगळा दर आकारण्यात येत आहे.वाहन तर सारखेच असुन याकडे ही लक्ष देण्याचे ढोसणे यांनी निवेदनात म्हणटले आहे.परवाला हडोळती टोल वर वाहनचालका कडुन जास्तीचा टोल घ्यायल्याने वाहन मालकाने विचारणा केली असता पहीले पैसे भरा नंतर बघुत म्हणत वाहनधारकांना तक्रार करावयाचे होते तर तक्रार बुक सुध्दा उपलब्ध नव्हती आणी उध्दट वागणुकीमुळे तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडुन ग्राहक मंच कडे न्याय मागण्यात येणार असल्याचे शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी पाटील ढोसणे यांनी सांगीतले.
