भोकर। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उद्या भोकर शहरात दि.३ मार्च २०२४ रोज रविवार वय वर्षे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे. डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार व आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांच्या नियोजनानुसार आज दि. २ मार्च रोजी भोकर शहरात सकाळी १० वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जनजागरण प्रभातफेरी राम रतन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीनी, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील कर्मचारी, विमल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व नूतन हायस्कूलचे विद्यार्थी यांच्या मार्फत भोकर शहरातील मेन रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय रोड व ईतर भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली.

लस द्या बाळा पोलिओ टाळा, लसीकरणाला साथ द्या पोलियोवर मात करा, पोलिओ पाजवा देश वाचवा, पल्स पोलिओ रविवार आदि घोषणांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जनजागरण प्रभात फेरी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. भोकर शहरातील विविध भागात वाहनचालक सोहेल शेख यांनी रुग्णवाहिका द्वारे फिरुन पल्स पोलिओ लसीकरण मोहिमचे मायकिंग व अलॉन्सिंग करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, वाहनचालक रवी वाठोरे, राम रतन नर्सिंग कॉलेजचे मंगेश जाधव, पुष्पा दुधारे, सुवर्णा टिळेकर, विमल इंग्लिश स्कूलचे अविनाश धकाते, राजन लोखंडे, भाऊराव राठोड, अतुल नागलपले, नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक पठ्ठेवाड सर, शिक्षक प्रल्हाद राठोड, धनंजय बुडकेवार, गुलशन दासरे,लक्ष्मण मदने, नरेंद्रकुमार चटलावार, रत्नाकर सुरंगलीकर, भंडरवाड सर, शेख सर, कदम सर, बनकर सर, पाटील सर, राजगडकर सर, जाधव सर, दासरे सर, शिक्षका श्रीमती हंसनाळे, वरवंटकर, आनेराव,निलावार आदि पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जनजागरण प्रभात फेरी मध्ये सहभागी होते.

