डोळ्यात मिरचीची पावडर टाकून सराफ्याला लुटणारी टोळी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। बोधडी ता. किनवट येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरचीपुड टाकुन सोन्या चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटनारी टोळी मुद्देमालसह नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही करून ताब्यात घेतले आहे.

दिनांक 28/01/2024 रोजी रात्री 18.30 वाजता फिर्यादी हा त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे असलेली बॅग घेवुन घराकडे जात असतांना त्यास बोधडी गावचे रेल्वे अंडर ब्रिज येथे फिर्यादीचे डोळयात मिरचीपुड टाकुन त्याचे जवळील सोने, चांदीचे दागीने व नगदी असे एकुण 7,58,655/- रुपयाचा माल जबरीने चोरुन नेले वरुन पो.स्टे. किनवट येथे गुरनं 20/2024 कलम 392, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाच्या आरोपीचे शोध करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोउपनि आनंद बिचेवार यांची एक टिम नेमण्यात आली होती. सदर टिमने मौजे बोधडी गावात भेट देवून तेथील माहीतगार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेवुन गोपणीन माहितगार नेमुण गोपणीय माहिती घेतली असता माहिती मिळाली की, संशईत इसम नामे किशोर ऊर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्या पासुन फरार होता.

त्यावरुन त्याचा शोध घेतला असता दिनांक 17/04/2024 रोजी रात्री तो रेल्वेस्टेशन नांदेड परीसरात आल्याची माहिती पोउपनि श्री बिचेवार यांचे टिमला मिळाली त्यांनी त्यास शिताफिने ताब्यात घेवुन गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की त्याचा मित्र नामे बाबुराव त्र्यंबक शहाणे रा. बोधडी याने त्याचा भाऊ दत्ता शहाणे याने बाबुराव शहाणे यांचे दुकाणाचे बाजुला सराफा दुकाण टाकल्याने त्याचे मनात राग होता. सदर दत्ता शहाणे याचा जाण्याचे व येण्याचे मार्गाची रेकी करुन त्याचे जवळील सोने-चांदीचे बॅग लुटण्याचा आरोपी किशोर ऊर्फ बारक्या व बाबुराव शहाणे यांनी कटरचुन आरोपी नामे 1.. संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड, 2. दिलीप व्यंकटी मेटकर रा. वडारगल्ली मुदखेड याचे मदतीन सदरची जबरी चोरी केली असल्याचे कबुली दिली.

त्यावरुन आरोपी नामे 1. किशोर ऊर्फ बारक्या पि.तानाजी सोळंके वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. अकोली ता.उमरखेड जि. यवतमाळ ह.मु. आबादी बोधडी, 2. संतोष पि. शिवाजी मुंडे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. शिवशंकर नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड, 3. बाबुराव त्र्यंबक शहाणे वय 49 वर्षे व्यवसाय व्यापार रा. शास्त्रीनगर बोधडी ता. किनवट यांचा शोध घेवुन त्यांचे कडुन सोन्या व चांदीचे दागीने किंमती 6,23,015/-रुपयाचे व नगदी रुपये 30,000/-असा एकुण 6,53,015/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व दिलीप व्यंकटी मेटकर रा. मुदखेड याचा शोध घेतला पण तो मिळुन आला नाही त्याचा शोध चालु आहे. वरील तिन आरोपी यांना पो.स्टे. किनवट येथे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस. अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, तानाजी येळगे, महेश बडगु, मारोती मोरे, गजानन बयनवाड, उदयसिंग राठोड, संजिव जिंकलवाड, चालक मारोती मुंडे, कलीम शेख यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!