
हिमायतनगर, अनिल मादसवार। धनुष्यबाण हे प्रभु श्रीरामचंद्राचं प्रतीक आहे, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदीजीना मतदान होणार आहे. येत्या 26 तारखेला इतिहास घडविण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना निवडणूक आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. दिवसरात्र एक करून मताधिक्याने निवडुन आणून अबकी बार 400 पार करून मोदींजीना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मतदान आणि मागील10 वर्षात मोदींनी केलेल्या कामाची माहिती देत मी बाबूराव म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलं.
ते हिमायतनगर येथे आयोजित महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत बोलत होते. बैठकी नंतर शहरातील श्री परमेश्वर मंदिर बसस्टॉपवर असलेल्या विविध दुकानांना भेटी देऊन धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून बाबुराव कदम यांना मताधिक्याने निवडणूक आणण्यासाठी मतदानरुपी आशिर्वाद द्यावे असं आवाहन मतदारांना प्रसिद्धी पत्रक वितरीत करून करण्यात आले. यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार 400 पार म्हणत बाबुराव कदम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या जोरदार घोषणा दिल्या.
पुढे बोलताना रामदास पाटील सुमठाणकार म्हणाले की, बाबूराव कदम कोहळीकर हा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे, ही जाण ठेऊन सर्वांनी मतदान करावे, अबकी बार 400 पार करण्यासाठी हिंगोली येथील महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर हे एक हजार टक्के निवडून येणार आहेत, तरीदेखील कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे. यावेळी बाबुराव कदम यांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदींजीना मतदान असं समजून महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा उपस्थित सर्वांनी संकल्प केला. यावेळी सिनेकलावंत विनय देशमुख, जेष्ठ शिवसैनिक सत्यवृत्त ढोले, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे आदिंसह मोठया प्रमाणात भाजप, शिवसेना व मित्रपक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
