नवीन नांदेड। पूर्वी क्रिकेटमध्ये पाच दिवसांचा खेळ खेळला जायचा कालांतराने वन डे रुपाने खेळला जातोय, क्रिकेट ‘आयपीएल’ सारखाच रस्सीखेच एनपीएल हा क्रीडा प्रकारही खेळाडू निश्चितच स्वीकारतील अशा नवीन रुपाला जनता, खेळाडू स्वीकारतील अशी प्रतिक्रिया संपादक ,जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे यांनी सिडकोतील जिजाऊसृष्टी येथे २९ आक्टोंबर रोजी सायं.६ वाजता रस्सीखेच ‘नांदेड प्रिमीयर लीग’ स्पर्धा घेण्यात आल्या या प्रसंगी ते बोलत होते.
एकता प्रबोधनमंच तसेच जिल्हास्तरीय टग ऑफ वार (रस्सीखेच) च्यावतीने आयोजित रस्सीखेच एनपीएल स्पर्धा उद्घाटनप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, बालाजी शिरसागर, संतोष पाटील,शेषराव क्षिरसागर, टी.एन रामन बैनवाड, पोलिस उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे,डॉ, राहुल वाघमारे,ऋषी मैड,संयोजक दिगंबर शिंदे, डॉ.राहुल वाघमारे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुतळा पुजन, दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली,प्रास्ताविक डॉ. राहुल वाघमारे यांनी केले.यात रस्सीखेच स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडुंना शासकीय नोकरीत स्थान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांचे स्वागत तसेच पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा सेवानिवृत्ती बध्दल गौरव करण्यात आला.यावेळी अनेकांनी रस्सीखेच एनपीएल स्पर्धेच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. १० संघ यात सहभागी झाले होते,यात प्रथम रोख रक्कम ७ हजार, सन्मानचिन्ह (कार्यकर्ता फाउंडेशन), द्वितीय (तरोडा टायगर्स) रोख ५ हजार तर रोख ३ हजार (राहुल रॉयल रॉकस्टार) यांना बक्षीस वितरीत केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रस्सीखेच एनपीएल स्पर्धेच्या संयोजक कमिटीचे यांच्या माध्यमातून राहुल चंदेल , संतोष कांबळे, विशाल गडंबे, ग्यानोबा गिरडे, मुकुंद डमरे, महेश गुपीले, संगमेश्वर शिंदे, अश्फाक सय्यद,रवि काळे,निलेश डोंगरे ,संदीप कदम,शुभम कदम यांनी परिश्रम घेतले.