नांदेडलाईफस्टाईल

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 124 रुग्ण बरे होऊन परतले घरी

नांदेड। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 1 हजार 103 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 780 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत.

मागील 24 तासात म्हणजेच दि. 3 ऑक्टोंबर ते 4 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 170 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 124 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 14 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 3 नवजात बालक (पुरुष जातीचे 1, स्त्री जातीचे 2 ) व बालक 1 (स्त्री जातीचे वय 12) व प्रौढ 10 (पुरुष जातीचे 7, स्त्री जातीचे 3) यांचा समावेश आहे.

गत 24 तासात 38 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 25 प्रसुती करण्यात आल्या. यात 13 सीझर होत्या तर 12 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!