उस्माननगर| दरवर्षी दिला जाणारा कै. नागोराव गणपतराव पांडे ,लाठकर वैद्यकीय ट्रस्ट , नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ” जीवन गौरव पुरस्कार २०२३ ” या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार उस्माननगर येथील माजी मुख्याध्यापक व जिल्हा परिषद तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा. श्री. विश्वासराव विठ्ठलराव लोखंडे गुरुजी यांना जाहीर झाला असून सदरील पुरस्कार दि.५ डिसेंबर रोजी मंगळवारी माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
उस्माननगर येथील माजी मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लोखंडे गुरुजी यांनी आपल्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांना योग्य संस्कार, दिशा , मार्गदर्शन करून घडविले .आज त्यांचे विद्यार्थी विविध पदावर काम करणारे अनेक अधिकारी गुरुजींचे आवडीने नावं घेतात. एक शिस्त प्रिय, शांत संयमी स्वभावाचे लोखंडे गुरुजी म्हणून पंचक्रोशीत नावं घेतात.त्यांच्या जीवन कार्याचा आढावा व तळमळ पाहून कै.नागोराव गणपतराव पांडे, लाठकर वैद्यकीय ट्रस्ट , नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ” जीवन गौरव पुरस्कार २०२३ ” या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार वितरण दि.५ डिसेंबर मंगळवारी सकाळी ११ वा. समता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. तरी परिसरातील शिक्षक प्रेमींनी , नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे भालचंद्र लाठकर , प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी , मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड , यांनी केले आहे.