सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड महानगर आंदोलन ईशारा देताच साफसफाई सुरूवात
नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घाणीच्ये साम्राज्य विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर कडून आंदोलन करण्याचा ईशारा देताच सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी पाहणी करून सिडको परिसरातील संभाजी चौक भागातील रस्ता दुतर्फा असलेली घाण, कचरा व नाले साफसफाई स्वच्छता विभागाला आदेशीत करून सफाईला सुरूवात केली असून लवकरच परिसर स्वच्छ साफसफाई करून देण्याचे आश्वासन पदाधिकारी यांना दिले.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या संभाजी चौक व जुनी ईमारत वसंतराव नाईक भागात,
स्मशान भुमी व नागलोक बौद्ध विहार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या, कचरा,साफसफाई नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुरंगधी पसरली तर कचरा अस्त व्यस्त पसरल्याने व रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिक महिला,वाहन धारकांना व विधार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे तर स्वच्छता विभाग निरीक्षक व सफाई कामगारांनी दैनंदिन सफाई कडे दुर्लक्ष केले होते.
अखेर नांदेड दक्षिण वंचित बहुजन महाआघाडी यांच्या वतीने सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व पदाधिकारी यांनी घाणीचे साम्राज्य तात्काळ साफ सफाई करून दुषित पाणी,व पावसाळ्या तील पाण्याचा निपटारा करण्याची मागणी केली होती, निवेदन दखल घेऊन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी २३ जुलै रोजी सकाळी संभाजी चौक व परिसरात महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,महासचिव अमृत नंरगलकर,सल्लागार साहेबराव भंडारे यांनी परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत पाहणी केली व तात्काळ साफसफाई करून देण्याचे आश्वासन दिले.
तात्काळ परिसरातील घाणीचे साम्राज्य, साफ सफाई, तुंबलेले नाले व परिसरातील कचरायाचे ढिगारे व दुतर्फा रस्ता लगत असलेली घाण महिला पुरुष यांनी साफसफाई केली असून दैनंदिन साफ सफाई सह परिसरातील कचरा नाला सफाई करून देण्याचे आश्वासन दिले.