नवीन नांदेड। लातूर येथे पार पडलेल्या विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धा मध्ये इंदिरा गांधी हायस्कुल सिडको नांदेड येथील विद्यार्थी विवेक संजय सांगवीकर यांनी ५० मीटर ब्रेस्ट स्टोक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
६ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ते लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. विवेक सांगवीकर यांनी विभागीय पातळीवर मिळविलेल्या यशामुळे शाळेच्या लौकिकात भर पडला आहे.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बी.एस.शिंदे, उपमुख्याध्यापक जी.एम.शिंदे,पर्यवेक्षीका श्रीमती कोल्हेवाड, पर्यवेक्षेक कल्याणकर, पर्यवेक्षिका श्रीमती महाराज,वसंत शिंदे,क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे , संतोष स्वामी ,रमेश नांदेडकर , प्रशिक्षक,राजेश सोनकांबळे,मयूर केंद्र यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.