पोलीस पाटील पाच वृक्ष लागवड व संगोपन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात उपक्रम राबविणार,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने

नवीन नांदेडl शहरी व ग्रामीण भागात झालेली वृक्ष संख्या कमी झालेली पाहता आपण ही सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोलीस पाटील यांना एक गाव पाच वृक्ष संगोपन भुमिका साकारून प्रत्येक पोलीस पाटील यांना वृक्ष दिले व गावाचा कारभार पाहण्यासाठी नव्याने कलम ३४ व नवीन तीन कायदा बाबत माहिती आयोजित बैठकीत दिली.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४ जुलै रोजी पोलीस पाटील यांच्यी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी नवीन तीन कायदे व पोलीस पाटील यांच्या कडे असलेल्या कलम ३४ बाबद पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी माहिती दिली व शहरी,ग्रामीण भागात वृक्षाची कमी झालेली संख्या पाहता,एक पोलीस पाटील पाच वृक्ष संगोपन हा उपक्रम राबवून हद्दीत असलेल्या जवळपास ४० पोलीस पाटील यांना अंबा,वड,लिबं, यासह विविध वृक्ष देण्यात आले असून सार्वजनिक ठिकाण, ग्राम पंचायत कार्यालय,मंदिर,
सभागृह,शाळा या ठिकाणी लावून संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल,नागोराव
जाधव ,बाळासाहेब सुर्यवंशी, दिलीप कदम, सौ.अरुणा गजानन ठोके,संजय यनावार,लवकुश अवनुरे,अर्जुन मोगमपले,आंनद पवार,प्रविण हंबर्डे,पांडुरंग हंबर्डे,सुदर्शन कर्डीले,सिध्देश्वर पुयड,डक,सौ.श्रध्दा विजयकुमार खटके,सौ.सुमन खोसडे, सौ. जयश्री इंगळे,सौ.सुनीता व्यंकटराव आवातीरक,सौ. महानंदा यलगंदलवर सौ.अल्का बालाजी बोकारे, सौ. सुनीता शंकर गाडे, विलास दत्ताराम पुयड, यांच्या सह पोलीस पाटील उपस्थित होते.
या उपक्रमाचे उपस्थित पोलीस पाटील यांनी स्वागत करून पोलीस पाटील यांनी गावात या व्यतिरिक्त आणखीन वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले.
