साखळी उपोषणामध्ये ज्येष्ठांचा सहभाग सोमेश्वर येथील आंदोलनाचा सहावा दिवस

नांदेड| मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील सोमेश्वर येथे सकल मराठा समाजाच्या वतिने पत्रकार आनंदा बोकारे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.शनिवारी दि. ३० तहसीलदार संजय वारकड यांनी भेट देवून आंदोलकांशी संवाद साधला. दरम्यान, गावातील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी सहभाग घेतला असून शनिवारी दि. ३० सहाव्या दिवशी आंदोलन सुरू होते.
राज्यभरात मराठा आरक्षणा लढा व्यापक होत आहे, राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसाची मुदत दिली आहे. त्या अनुषंगाने जरांगे पाटील यांनी या कालावधीत साखळी उपोषण सुरू ठेवून मराठा आरक्षण लढा तेवत ठेवला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमेश्वर येथे सोमवारी दि:२५ पत्रकार आनंदा बोकारे सकल मराठा समाजाच्या वतिने साखळी उपोषणास बसले आहेत. गोदावरी तिरावर जुन्या गावातील सोमेश्वर मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात गावातील ज्येष्ठ महिला नागरिकांनी सहभाग घेत आरक्षणाची मागणी केली आहे.
आरक्षण लढ्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही आरक्षणाचे महत्व पटल्याने आंदोलनात सहभगी होवून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, तुमच आमच नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत हरीपाठ, भजन गावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्यात यावेत, आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, जरांगे पाटील यांना दिलेल्या कालावधीत मराठा आरक्षणाची आंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यासाठी पत्रकार आनंदा बोकारे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी दि. ३० तहसीलदार संजय वारकड, मंडळअधिकारी कुनाल जगताप, तलाठी विजय रनविरकर यांनी भेट देवून आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलक पत्रकार आनंदा बोकारे, जनाबाई बोकारे, गजानन दि.बोकारे, गणेश मु. बोकारे, विलास बोकारे, गणेश बोकारे, डिगांबर बोकारे, मनोहर बोकारे आदी ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाचा कानाडोळा
सोमेश्वर येथे सोमवार दि. २५ पासून मराठा सामाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पत्रकार आनंदा बोकारे साखळी उपोषणास बसले आहेत. सकल मराठा समाजाच्या वतिने सुरू असलेल्या आंदोलनस्थळा पासून अवघ्या काही फूट अंतरावर गोदावरी नदीचे तीस ते चाळीस फूट खोल नदी पात्र आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन विशिष्ठ वळणावर येवू ठेपल्याने प्रशानाकडून खबरदारीच्या उपाय योजना राबविल्याची आवयी उठविण्यात येत आहे. आंदोलनस्थळी तालुका प्रशासनाचा साधा कर्मचारी तर नाहीच पण पोलिस प्रशासनाचा एकही कर्मचारी दिवसातून एकदाही फिरकत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
आंदोलनाकडे पाठ प्रशासनाचा स्वार्थ ?
साखळी उपोषणासाठी आनंदा बोकारे यांनी गोदावरी तिरावर सोमेश्वर मंदिर परिसराची निवड करून एक प्रकारे प्रशासनाच्या स्वार्थाला सुरूंग लावला आहे. आंदोलनस्थळापासून हाकेच्या अंतरावर बेसूमार अवैद्य रेती उपसा होत आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोन ही त्याच ठिकाणी म्हटल्यावर आंदोलनस्थळावर पहारा देणं म्हणजे डोळे झाकून मांजरीने दुधावर ताव मारल्या प्रमाणेच म्हणांव लागेल या मोठ्या अवघड समस्येमुळे प्रशासनाने आंदोलनाकडे जानिवपूर्वक डोळेझाक केल्याची समाजात चर्चा आहे.
