हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर रस्त्याच्या कामाची संत गती आणि गुत्तेदाराची अभियंता, राजकीय नेत्याकडून होत असलेली पाठराखण यामुळे रस्त्याचे काम अर्धवट ठेवून गुत्तेदाराने मनमानी कारभार केला आहे. यामुळे उखडलेल्या रस्त्यावर अनेक अपघात होत असून, रस्ता कामाची गुणवत्ता देखील ढासळली आहे. करण्यात आलेल्या अर्धवट थातुर माथूर पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम चांगल्या गुत्तेदारांमार्फत पूर्ण करून द्यावे अशी मागणी रस्त्याच्या बिकट परिस्थितीने वैतागलेल्या गावकऱ्यातून केली जात आहे. अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा शाहीर रामराम वानखेडे व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर – पार्डी – एकघरी या ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता. एव्हडेच नाहीतर पुन्हा ५ वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूदही यात करण्यात आली आहे. या रस्ता कामाचे उदघाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आ.माधवराव पाटील जवळगावर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सदरील काम ठेकेदार में एम एस सिद्दीकी, औरंगाबाद यांच्यामार्फत केले जात आहे. या कामाला दि. ७ जानेवारी २०२२ ला सुरुवात झाली. मात्र ठेकेदाराने संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने काम सुरु केले त्यामुळे आजघडीला २ वर्षाचा कार्यकाळ उलटले तरी अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून, या खड्डेमय व उखडलेल्या खाडीमय रस्त्याने ये जा करताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो आहे. आत्तापर्यंत या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात झाले असून, एका महिलेचा जीवदेखील गेला आहे. असे असताना या भागाचे सबंधित अभियंता सदरील काम पूर्ण करून घेण्यात का..? चालढकल करत आहेत. असा सवाल पळसपूर सह या भागातील विविध गावच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा शाहीर रामराव वानखेडे व या भागातील नागरिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागील वर्षी या कामाबाबत नागरिकांनी आवाज उठवून ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट व मनमानी कामाची पोलखोल करण्यात आली होती. नागरिकांनि केलेल्या तक्रारीनंतर येथील मटेरियल रिजेकट (रद्द) करण्यात आले होते. त्यामुळे काही दिवस ठेकेदाराने काम बंद ठेऊन देखरेख करणारे तत्कालीन अभियंता सुधीर पाटील यांच्या आशीर्वादाने रद्द केलेल्या गिट्टीचा पुन्हा वापर करून थातुर माथूर रस्ता करण्याचा घाट रचला. नागरिकांचा रेटा पाहून त्यानंतर ठेकेदारने रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केल्याने आजघडीला ७३० कोटीच्या रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे या भागातील नागरिक गुत्तेदाराच्या निकृष्ट व मनमानी कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

 

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version