नांदेड। रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी चे काम सुरु असल्यामुळे बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज 357 A मधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.

रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी 357 A चे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडरब्रीज 357 A मधून जाणारा रस्त्याऐवजी कामठा रोड ते नमस्कार चौक दरम्यानच्या रोड वरील विद्यमान मालटेकडी ओव्हर ब्रीज व देगलूर नाका-बाफना टी पॉईट या रस्त्यावरील विद्यमान बाफना रोड ओव्हर ब्रिज या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 10 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version