नवीन नांदेड़। डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वेधकीय महाविद्यालय व रुग्णालय. विष्णुपूरी नांदेडची कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.

दिनांक 27 फेब्रूवारी रोजी सन 2024 ते 2029 या कालावधीचा डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी मंगनाळे यांचे अध्यक्षतेखाली व बी .बी.बोधगिरे,उप निबंधक, सहकारी संस्था नांदेड यांच्या उपस्थितीत पार पडली निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सुरुवातीपासून रुग्णालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे व भिमराव परोडवाड यांनी महत्वाची भुमिका पार पाडून सदर निवडणूक बिनविरोध पार पाडली व पदाधिका-यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.

अध्यक्ष भीमराव गोविंदराव परोडवाड उपाध्यक्ष श्रीमती ममता रुधनसिंग उईके सचिव विजय देसाईराव देशमुख सहसचिव सतिश पंडितराव पवार उपस्थित संचालक मंडळ सदस्य सतिश इंगळे, उध्दव केंद्रे,निखील वाडीकर,दिपक वानखेडे, पदमाकर कुलकर्णी, केशव जिंकलवाड, श्रीमती योगेश्वरी आईटवार,लक्ष्मीकांत कळसकर, अतुल इंगोले, हे निवडून आले .

या बिनविरोध निवडीबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांचे व संचालकांचे अभिनंदन केले व संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉ.सुधीर देशमुख, अधिष्ठाता, डॉ.वाय.एच.चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ.संजयकुमार मोरे, डॉ. विशाल टेकाळे, डॉ. मुकूंद कुलकर्णी, डॉ.पंजाबराव कदम, बालाजी डोळे तसेच माजी संचालक व पतसंस्थेचे सर्व सभासद यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याबदल अध्यक्ष भिमराव परोडवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version