नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महिला काँग्रेस आयच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका डॉ. ललिताताई शिंदे बोकारे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ. ललिता शिंदे यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नगरसेविका म्हणुन डॉ. ललिता शिंदे या २०१२ ते १७ साली निवडून आल्या, याच काळात महिला बाल कल्याण समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली होती तर जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती.नगरसेविका असतांना विकासासाठी कटिबद्ध राहुन केलेल्या कार्याची नोंद घेण्यात आली.
सामाजिक व राजकीय शैक्षणिक कार्यात सहभागी होऊन अनेक महिलांना विविध पदावर संधी दिली तर दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्ष कार्यरत असतांना अनेक भागातील महिलांना या कार्यकारिणी मध्ये समाविष्ट केला, काँग्रेस पक्षाशी गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असुन त्यांनी उलेखनीय कार्याबद्दल नोंद घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आमदार अमिताभाभी यांच्या आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.

आ.अमरनाथ राजूरकर,आ. मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा माजी महापौर मंगलाताई निमकर, डॉ.मिनलताई खंतगावकर,कविता कळसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मगाराणी अंबुलगेकर, माजी महापौर जयश्री ताई पावडे, डॉ.रेखाताई चव्हाण, मंगला धुळेकर, अनिता इंगोले,नबीद कादरी समाधानी, यांच्या सह वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे, माजी अध्यक्ष विनोद कांचनगिरे,व पदाधिकारी यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version