उमरखेड| परिसरातील मिलिंद महाविद्यालय मुळावाचे मराठी विभाग प्रमुख, कवी, समिक्षक, लेखक, प्रबोधनकार तथा जागतिक साहित्यिक प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे यांना ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2024 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

थायलंड देशांमधील पटाया शहरात पार पडणाऱ्या तिसऱ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ .श्रीपाल सबनीस, उत्तर प्रदेश येथील डॉ . एन सिन्हा त्याच प्रमुख अतिथी  डॉ .परा पालम डोंगशाही , थायलंड, भिक्खू प्रथम, थायलंड, भिक्खु धम्मा स्वामी, म्यानमार, डॉ . के पी . वासनिक, दिल्ली व महामंडळाचे अध्यक्ष डॉ . दीपककुमार खोब्रागडे यांच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे .डॉ . काळबांडे यांनी, मराठी भाषेचा व त्याचबरोबर त्यांचा विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या हेतूने आतापर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दुबई, मलेशिया , इंडोनेशिया ,श्रीलंका, मालदीव , नेपाळ, मॉरिशस याचबरोबर ‘भारतीय बौद्ध धर्म आणि जागतिक बौद्ध धम्म ‘ यांच्या अभ्यासासाठी भूतान , तैवान या देशाचा अभ्यास दौरा सुद्धा केलेला आहे.

महाराष्ट्रात सह अनेक राज्यात जवळपास दोन हजाराच्या वर विनामूल्य प्रबोधनाची व्याख्याने देऊन त्यांनी समाज जागृती चे कार्य गेल्या 30 वर्षापासून करीत आहेत .त्यांना आत्तापर्यंत महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार , प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार ,सत्यशोधक साहित्य पुरस्कार .छत्रपती शाहू महाराज समाज रत्न पुरस्कार , डॉ . बी आर . आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड ,नवी दिल्ली ,अस्मितादर्श उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार ,प्रा . राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार ,डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार यासह जवळपास 200 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे .

त्यांच्या संपूर्ण या कार्याचा गौरव करण्यासाठीच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला , शाल , स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव थायलंड येथे होणार डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रख्यात साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम जे जेष्ठ साहित्यिक प्रा रविचंद्र हडसनकर , कथाकार  प्राचार्य नागनाथ पाटील , जागतिक शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय सिंगलवार , उपाध्यक्ष शशी डंभारे, दिपकभाऊ आसेगावकर  डॉ युवराज मानकर, प्रा विलास भवरे ‘ डॉ . प्रदीप इंगोले , प्रा . ज्योती काळबांडे ,डॉ . धनराज तायडे  यांच्यासह पत्रकार अविनाश खंदारे ‘ संतोष मुडे , अरविंद ओझलवार, प्रशांत भागवत दत्तराव काळे , दत्तात्रय देशमुख संतोष कलाने, अझहर खान , निळकंठ ढोबे, प्रविण सुर्यवंशी , शाहरुख खान पठाण , डॉ अजय नरवाडे , कैलास कदम , विशाल माने , प्रा अभय जोशी यांच्यासह अनेक पत्रकार संघटनेने त्यांचे अभिनंदन केले . विषेश उलेखनीय डॉ . काळबांडे यांना या साहित्य संमेलनात परिसंवाद तथा कवी संमेलनाचे अध्यक्ष पद देऊन महामंडळाचे अध्यक्ष डॉ दिपककुमार खोब्रागडे यांना गौरव केला आहे.  

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version