नायगांव, रामप्रसाद चन्नावार| दि २० डिसेबंर सानेगुरुजी विद्यामंदिर देगाव येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .याप्रसंगी मुख्याध्यापक श्री कोंडावार सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमूख अतिथी समता दुत श्री दिलीपराव सोंडारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागठाणे बालाजी यांनी बांबाच्या गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला या भजनानी केली .बांबाचे काम गाव तिथे स्वच्छता दिवसभर गावातील घाण साफ करायचे रात्री सर्वांचे मन आपल्या किर्तनातून साफ करण्याचे काम बाबा करत असत अंध श्रध्देला थारा नको , नशा पाणी करू नका , रिण काढू नका , काम करा आई वडीलांचा स्वाभिमान जपा . शिक्षण घ्या असे ठणकाऊन सांगत असे . या प्रसंगी सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते श्री शिंदे आर .टी. धुळेकर उमाकांत, शहापूरे पीराजी , रणवीरकर दिलीप श्रीमती जाधव मॅडम ,गंगाधर बेळगे , सुत्र संचलन श्री बालाजी नागठाणे सर यांनी केले.