नांदेड| भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून नांदेड महानगर चिटणीस पदी क्षितिज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी नुकतेच महानगर कार्यकारिणीचा विस्तार केला असून संघटात्मक नियुक्तया केल्या आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक क्षितिज जाधव यांची महानगर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह पवन जाधव, विक्की चव्हाण, संतोष गवळी, पप्पु कांबळे, योगेश वीरास्वामी, सिद्धांत वाठोरे, विजय जाधव, पप्पु कोल्हे, कपील तिमेवार, रोहिदास पाटील, अविनाश दहीफळे, परमजितसिंघ बावरी, प्रज्वल झिंझाडे, जतबिरसिंघ बावरी, योगेश पुंडगे, सतीश गजभारे, गोविंद पुंडगे आदींसह अनेकांनी क्षितिज जाधव यांचे अभिनंदन केले आहे.