नांदेडलाईफस्टाईल

दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानुन काम करण्यासाठी प्रयत्नशील -आ.जवळगावकर

हिमायतनगर| हदगाव विधानसभा क्षेत्रासह संबंध नांदेड जिल्ह्याला कै पंजाबराव पाटील जवळगावकर दादांनी अल्पावधीत ज्येष्ठांच्या सहवासात राहून जनसामान्यांच्या कामासाठी वाहुन घेतल्याचा ईतिहास सर्वा समोर आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मतदार संघाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानुन काम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे देखील त्यांच पध्दतीने जनतेची सेवा करण्याचा संकल्प पूर्ण करणार असल्याचे प्रतिज्ञा हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतली.

जवळगाव येथे युवा नेते कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांची दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रधान्जली अर्पण करत अभिवादन करण्यात आले. या अभिवादन सभेप्रसंगी पुढे बोलताना आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की, माजी आमदार कै निवृतीराव पवार, दादाश्री कै पंजाबराव पाटील यांनी आपल्या आयुष्यात सामान्यांसाठी जीवन समर्पित केले होते. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आईसह मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने काम करण्यासाठी आजपर्यंत कमी पडलो नाही. भविष्यात देखील कुठेही कमी पडणार नाही. ईश्वराच्या कृपेने सावरल्यामुळे जनतेच्या सार्वजनिक कामासाठी आणि वैचारिक कामासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा संकल्प घेतला आहे. बाबासह दादांचे मतदार संघाच्या विकास रुपी स्वप्नला पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पर्यटन करत राहणार आहे, यात कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

याप्रसंगी कॉग्रेसचे हदगाव येथील माजी तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, किशोर पाटील कदम , माजी जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवशी, शामराव पाटील मनाठकर, गुत्तेदार कैलास पाटील माने, माजी संचालक शेख रफिकभाई, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, हदगाव तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सिताराम पाटील फळीकर, पांडुरंग पाटील पवार, डॉ . राजेंद्र वानखेडे ,बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, शिवप्रसाद सुर्यवंशी हडसणीकर, चेयरमन गणेशराव शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, भुजंगराव पाटील देवसरकर, संतोष पाटील लिंगापुर, आत्माराम पाटील वाटेगावकर, संचालक संजय सुर्यवंशी , सरपंच साईनाथ पाटील सुर्यवंशी, राजीव पाटील जाधव, ऊपसरपच संतोष पाटील देवराये, दिलीप चव्हाण गोर्लेगावकर,बाजार समितीचे संचालक हादरगे, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, राजीव पाटील शिरफुले, गणेशराव देवराये पाटील, संतोष अंबेकर, संदिप काळबांडे, ऊपचेअरमन विठ्ठलराव जाधव, नितेश जैस्वाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश पोहरे, नागमवाड, श्नीदत पवार, योगेश चिलकावार, सुनील वानखेडे, ऊपसरपच सुभाष माने, सरपंच दत्तात्रय पवार, शेख इर्शाद, नासर पठाण, प्रवीण कोमावार, विकास गाडेकर, गोविंद बंडेवार, अ. बाकी सेठ, आशोक अनगुलवार, लक्ष्मणराव व-हाडे, नारायण बासरकर, रामराव पाटील कदम, भगवान कदम, सुर्यवंशी यांच्यासह जवळगाव आणि परीसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्नीमती शांताबाई निवृतीराव पवार यांची विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यानी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!