नांदेड। काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी नगरसेवक मुन्नासिंह तेहरा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तेहरा यांच्या गळ्यात भाजपाचा दुप्पटा टाकला.
मुन्नासिंह यांच्या प्रवेशाने हनुमान पेठ भागात व्यापारी वर्ग आणि जनतेत आनंदाच वातावरण आहे. यावेळी मुन्नाभाई यांनी विश्वनेता नरेंद्र मोदीजी यांचं देशा साठी केलेलं कार्य आणि गोर गरिबांसाठी केलेली योजना पाहून मी या भाजप पक्षा मध्ये प्रवेश घेत आहे आणि मी पक्ष बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ पक्ष साठी काम करेन असेही त्यांनी सांगितले.
सूपर वॉरियर्स यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक मुन्नासिंह तेहरा यांच्या सोबत अनेक कार्यकरत्यानी यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, आदी उपस्थित होते.
मुन्नासिंह तेहरा यांनी नगरपालिका व महानगरपालिका मध्ये नगरसेवक, उपाध्यक्ष व सभापती पद भूषविले आहे. राजपूत समाजात ही त्यांनी अनेक पदे भुषविले आहेत. बावनकुळे साहेबांनी मुन्नासिंह तेहरा यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या