नांदेडमनोरंजन

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सिडकोत ‘परफेक्ट सुनबाई -खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

नवीन नांदेड। रयतेचे राजे कुळवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे ‘परफेक्ट सुनबाई -खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वतीने ‘परफेक्ट सुनबाई- खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई पाटील,आशाताई शिंदे, मीनलताई खतगावकर ,प्रणिताताई देवरे चिखलीकर ,वत्सलाताई पुयड, विद्याताई पाटील,अरुणाताई जाधव व शशिकलाताई बिरादार यांच्या हस्ते होणार आहे. ‘परफेक्ट सुनबाई खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे निवेदन चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध निवेदक सतीश कासेवार हे करणार असून दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता जिजाऊ सृष्टी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात होणार आहेत.

या सोहळ्याला परिसरातील महिला,युवतीने व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती सिडको अध्यक्ष दिगंबर शिंदे व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी सिडको यांच्या वतीने करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!