नांदेड। जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे *दि.5 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानतीर्थ परिसर , विष्णुपुरी नांदेड* येथील मैदानावर जिल्हास्तरीय २० वर्षाच्या वरील पुरुष व महिला वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली .

राज्यस्तरीय स्पर्धा दि 1 ते 3जून 2024 या कालावधीत नागपूर* या ठिकाणी संपन्न होणार आहेत . स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नाव नोंदणीसाठी एक फोटो , मुळ १० वी ची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, आधार कार्ड प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी १०० रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क १५० रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस पुढील स्पर्धेत सहभागी होता येईल. *तसेच AFI ची नोंदणी करणे आवश्यक आहे. सोळा वर्षाखालील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊ नये. स्पर्धा निरीक्षक म्हणून योगेश थोरबोले सचिव उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटना हे उपस्थित राहणार आहेत.

तरी जिल्हयातील 100, 200,400, 600, 800, 5000 ,10 की. मी. धावणे, 20,30 कि.मी. चालणे तसेच गोळा फेक भाला फेक , थाळी फेक , हातोडा फेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, क्रॉस कंट्री, या प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूनी जास्तीत जास्त संख्येने व आवश्यकत्या तयारीनिशी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे, डॉ दि.भा. जोशी, डॉ उमेश भालेराव, जिल्हा क्रिडाधिकारी नादेड जयकुमार , ॲथलेटिक कोच शिवकांता देशमुख, नारायण सूर्यवंशी, कुमार कुलकर्णी , अविनाश रामगिरवार ,महेंद्र कुडगुलवार , प्रशांत जोशी , राजेश तिवाड़ी, किशोर पाठक , शारदा कदम,

सुरेश पद्मावार, रूपाली कुलकर्णी, किरण कुलकर्णी, भगवान नागरगोजे, विष्णू पुर्णे, प्रा. अमृत जाधव, वैभव दमकोडवार , डी.डी.चव्हाण , मुजाजी काकडे, लक्ष्मण फुलारी, बालाजी भवानकर, संतोष सोनसळे, संतोष आणेराव, ज्ञानेश्वर सोनसळे, शेख शब्बीर , संतोष वाकोडे, बालाजी गाडेकर,गोविंद पांचाळ,कांचन मस्के, रविकिरण क्षीरसागर, डॉ. महेश जाधव ,शरद कपाटे, गंगाधर हबर्डे , ज्ञानेश्वर कोडलांडे , नंदू जाधव , सिद्धोधन नरवाडे, साईनाथ दंतुलवाड आदी पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8625021219 /9421819020 / 8623005600 / 75884 30145 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version