नांदेड| महासंस्कृती महोत्सव हा एकात्मता, सामाजिक सौहार्द यासह आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. हा महोत्सव नावारूपास आणणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कलांच्या सादरीकरणासाठी विशेष राखीव वेळेद्वारे अधिकाधिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला लोकाभिमूख करण्यासह स्थानिक कलावंतांच्या याबाबत काही सूचना असल्यास त्या नियोजनाच्यादृष्टिने समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सुरेश जोंधळे, ज्येष्ठ शाहीर रमेश गिरी, बापु दासरी, नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, जयंत वाकोडकर, आनंदी विकास, विजय निलंगेकर, राधिका वाळवेकर, डॉ. राम चव्हाण, मंजूर हाश्मी, डॉ. वैशाली गोस्वामी, ॲड गजानन पिंपरखेडे, डॉ. विद्या झिने, डॉ. बालाजी पेनूरकर, चित्रकार कविता जोशी, वसंतराव बारडकर, विजय होकर्णे, दिनेश कवडे, शिवाजी टाक, मिना सोलापूरे आदी उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत याबाबत बैठकीत सहभागी कलावंतांनी मौलिक सूचना केल्या. बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version