हंडरगुळी/उदगीर/लातूर, विठ्ठल पाटील। हंडरगुळी व हाळी सह परिसरातील जनतेती “सिंघम” हे नाव बहाल केलेले i.p.s. पोलीस अधिकारी मा.श्री.निकेतनजी कदम यांनी “दे-दणादण” कामगिरीने “खाकीवर्दी” ची ‘आन,बान,शान,मान’ उंचावली होती. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाढवणा,हंडरगुळी येथील पोलीस अधिकारी भिमराव गायकवाड,एम.के.गायकवाड आणि संजय दळवे (पो.हे.काॅ) “धडाकेबाज’ कामगीरी करत असल्याचे मागील कांही दिवसातील कारवाही वरुन दिसते.

गत कांही दिवसात पोलीस चौकी,हंडरगुळीच्या संजय दळवे या जमादार साहेबांनी मटका,गुटखा,दारु या सारख्या अवैध धंद्यावर “धाडी वर – धाडी” टाकुन स्वत:चा “दरारा” दोन नंबरचे धंदेवाल्यांमध्ये निर्माण केला आहे.व पोलिसांचा “दरारा” पसरल्या- मुळे Api.भिमराव गायकवाड, P.i. एम.के.गायकवाड व H.C. संजयजी दळवे यांना पाहताच अवैध धंदेवाले कापतात “थरथरा” अशी चर्चा जनतेत होत आहे. i.p.s पोलिस अधिकारी हे जिह्यात होते तोवर त्यांना सगळीकडे सगळेच अवैध धंदेवाले “टराटरा” घाबरायचे.याचा अनुभव जिल्ह्याने घेतला होता.पण नुकतीच निकेतनजी कदम यांची बदली झाल्याने “बिळात लपलेले”व “अंडर ग्राऊॅंड” झालेले 2 नंबर,काळे धंदेवाले पुन्हा “वळवळ” करु लागलेत.माञ वाढवणा आणि हंडरगुळी येथील “डॅशिंग” सपोनी. भिमराव गायकवाड,पोहेकाॅ.संजयजी दळवे यांनी “गिअर” बदलला.

आणी गत कांही दिवसातच मटका,गुटखा व दारु या अवैध धंद्यावर”धाडीवरधाडी” टाकायला सुरुवात केल्याने वाढवणा व हंडरगुळी हद्यीत “खाकीवर्दी” चा “दरारा”पसरला आहे.आणि अवैध धंदेवाले “थराथरा” कापत आहेत. व येथील पोलीसांच्या “दणकेबाज” कारवाहीचे सर्वञ कौतूक व स्वागत होत आहे.तसेच आता मेन मार्केटसह राज्यमार्गावर वेडी-वाकडी थांबलेले व अपघातास कारण ठरु शकणारे दोन,चार चाकी वाहणे व हातगाडे यांचेवर तसेच कर्णकर्कश,फटाका आवाज करीत मेन मार्केटसह गल्ली बोळात व शाळा,काॅलेज एरियात बाईकवर हिंडणा-या टवाळखोरांवर आजवर कोण पण कारवाही केली नाही.तेंव्हा याकडे पण जातीने लक्ष देऊन कारवाही करावी.अशी अपेक्षा जनतेची आहे…

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version