श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर नगरपंचायत च्या वतीने माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला निसर्गरम्य ठिकाणी आय लव माहूर असा मजकूर असलेले सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. या ठिकाणी माहूर गडावर येणारे भाविक पर्यटक व शहरातील नागरिक फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते व या ठिकाणचा आनंद घेत होते. मात्र काही विघ्न संतोषी समाजकंटकांनी या सेल्फी पॉईंट मधील मजकुराची तोडफोड करून केली आहे व नुकसान केले आहे अशी तक्रार मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी 11 रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
माहूर शहरातून गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्गरम्य ठिकाणी नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांचे सर्व नगरसेवकांनी आय लव यू माहूर लिहिलेले इलेक्ट्रिक बोर्ड या ठिकाणी लावले होते. या ठिकाणी हजारो भाविक तसेच तालुक्यातील नागरिक सेल्फी घेत आनंद व्यक्त करत होते या बोर्डाच्या मागील बाजूस श्री रेणुका मातेचे मंदिर किल्ला महाकाली मंदिर सह इतर विलोभणीय दृश्य सेल्फीत दिसत असल्याने या ठिकाणी सेल्फी काढणाऱ्याची प्रचंड गर्दी होत होती.
अज्ञात विघ्न संतोषी मंडळींना नगरपंचायत चा हा आनंद देणारा उपक्रम सहन न झाल्याने त्यांनी या सेल्फी पॉईंटवर आलेल्या आय लव यू माहूर या शब्दाला लावलेल्या काचा आणि रेडियम तसेच चकाकणाऱ्या इलेक्ट्रिक बोर्डाची तोडफोड केली त्यामुळे सेल्फी काढणाऱ्यातून प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. याची याची दखल घेऊन नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सह सर्व नगरसेवक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी विघ्न संतोषी कृत्य करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक केली जाईल असे आश्वासन देऊन तत्काळ गुन्हा दाखल केला.