नांदेड। सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तलाव व धरणामधून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या या मोहिमेत सामाजिक संस्था व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, तसेच तलावातील काढलेला जास्तीत जास्त गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेवून जावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धरणामध्ये, तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणातील व तलावातील साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेवून जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो) विभागातर्फे लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे यावर्षीच्या हंगामात निश्चित जलसंचय वाढणार आहे. तसेच पूरप्रतिबंधक उपाययोजना होऊन शेताची सुपिकता वाढणार आहे.

जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत जसे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग नांदेड- 3356.89 ब्रास, मृद व जलसंधारण विभाग-618.37 ब्रास, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड 40206.01 ब्रास गाळ काढला आहे. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (द) नांदेड-106.007 ब्रास अशी आतापर्यंत 44287.28 ब्रास गाळ जिल्ह्यातील विविध तलावामधून काढण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध 40 तलाव व धरणामधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नॅशनल हायवे विभागाने त्यांना देण्यात आलेल्या कामांच्या परवानगी मधून 201410 ब्रास गाळ/मुरुम काढून नव्याने निर्मित शेततळे शेततलावाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहनानुसार जलसमृध्द अभियानातर्गंत लोकसहभागातून ही मोहीम सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी व विविध विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह गावपातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी यांचे प्रयत्नांमधून सुरु आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version