नांदेडसोशल वर्क

प्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा मिडिया| यावर्षीची यात्रा प्लास्टिकमुक्त व कचरामुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. ही संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी लोहा तालुक्यातील ग्रामसेवक बांधवांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन प्लास्टिक व कचरामुक्तीसाठी 10 जानेवारी रोजी सर्व ग्रामसेवकांनी मिळून 22 किलो प्लास्टिकचे संकलन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी मंजूषा जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.

या उपक्रमात एकाच दिवसात 22 किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले. या उपक्रमामध्ये गट विकास अधिकारी डी. के. आडेराघो, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, डी.आय. गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन शिंदे, सचिव शैलेश बिस्मिला, उपाध्यक्ष रमेश राठोड, अमृत शिंदे, हरिहर विश्वासराव, शरद गीते, कृषी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, संदीप कछवे, सचिव सय्यद इब्राहिम, सौ. लींगापुरे, सौ. पांचाळ, सौ. टोम्पेसह तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!