मी मतदान करणारच, सेल्फी पॉईंटला प्रतिसाद…

नवीन नांदेड। लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ , लोकसभा मतदारसंघ संघ १६ अंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड व मनपा नांदेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या सेल्फी पाईट मी मतदान करणारच यास सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकारी व नागरीकांनी ऊत्सफुत प्रतिसाद दिला.
नांदेड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २६ एप्रिल २४ रोजी सकाळी ७ ते ६ मतदान होणार असून जनजागृती उपक्रम अंतर्गत नांदेड वाघाळा महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपाल संधु यांनी सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेला दोन सेल्फी पाईटं उपलब्ध करून दिल्यानंतर २१ एप्रिल रोजी सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड सेंटर येथे मार्गदर्शक तथा नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या उपस्थितीत सेल्फी पॉईंटची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. चिंतोरे,दलित मित्र पुरस्कार प्राप्त नारायण कोलंबीकर , यांच्या सह वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्ये अध्यक्ष सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे,महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ विक्रेते सयोददीन शेख, दौलतराव कदम, मदनसिंह चोहाण,राम धांवडे,गजानन धांवडे,शुभम कुभांर,कार्तिक बोटेवाड,साई कुंभार, महेश सुताडे, गुरव लोणे, गणेश ठाकूर, अमोल नांदेडकर, गणेश डोळस, चंदु कांबळे यांचासह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते, नागरीक महिला युवक यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
