शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महा भव्य रक्तदान शिबीर आयोजन

नवीन नांदेड l शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजक दिलीपसिंह भागिले समन्वयक नांदेड दक्षिण विधानसभा यांच्या कडून महाभव्य रक्तदान शिबीर व अन्नदान वाटप २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सिडको मुख्य रोडवरील श्री साई मोटर्स लातूर फाटा येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रथमच या वर्षी नांदेड समन्वयक दिलीपसिंह बाबुसिंह भागिले यांच्या कडून महाभव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून या रक्तदान शिबीराचे ऊदघाटक नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार,नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख बंडु खेडकर,डॉ.सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महिला जिल्हा संघटक नांदेड वत्सलाताई पुयड, माजी ऊपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड दक्षिण उपजिल्हा प्रमुख व्यंकोबा येडे, भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे,नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे, पद्माकर सावंत, सिडको शहर प्रमुख जितुसिंग टाक, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांच्यी उपस्थित राहणार आहेत.
या शिबीराचे रक्तदान संकलन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपुरी नांदेड हे करणार असून या महाभव्य रक्तदान शिबीर मध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी व शिवसैनिक व नागरिक यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबीर यशस्वी करावे असे आवाहन आयोजक तथा नांदेड दक्षिण विधानसभा समन्वयक, व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, नांदेड दक्षिण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
