नांदेड। विख्यात लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या घटनावर पायबंद करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका शिष्टमंडळाने केली.
प्रा.बालाजी कोमपलवार, डॉ.विलास ढवळे, दत्ता तुमवाड, बालाजी पवार, वसंत जवादवार, शेतकरी संघटनेचे अॅड धोंडीबा पवार, कॉम्रेड उज्वला, शेख नजीर, शकीला शेख, चंद्रकांत घाटोळ, अरुण दगडू, बाबू जलदेवार आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.
हेरंब कुलकर्णी हे प्रागतिक चळवळीचे शिलेदार असून सामाजिक बदल घडविणारे कृतीशील सुधारक आहेत. त्यांच्यासारख्या विवेकवादी चिंतकावरील हा हल्ला विशिष्ट विचारावरील हल्ला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सतर्क बाळगावी यासाठी वेगळी कृती दल असावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, आदि यात सहभागी होते.