
नवीन नांदेड। सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या टिन शेड सेंटरला १९ जानेवारी रोजी २४ ला तिन वर्षे पूर्ण झाल्याबदल जेष्ठ,महिला ,विक्रेता यांच्या वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या शाल श्रीफळ सन्मान नावामनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व युवा नेते ऊदयभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पाठपुरावा करून १९ जानेवारी २०२२ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने मनपा निधी अंतर्गत ११ लक्ष रूपयाचा निधीतून हे टिन शेड उभारण्यात आले आहे. सिडको परिसरातील माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,मनपाच्या स्थायी समिती माजी सभापती मंगला देशमुख,सौ. इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे,सौ.बेबीताई गुपीले,श्रीनिवास जाधव,यांनी केलेल्या सहकार्य मुळे हे टिन शेड उभारणे शक्य झाले आहे.
१९ जानेवारी रोजी सकाळी ७ तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार,मदनसिंह चौहाण,शेख सयोघ्दीन ,एकनाथ श्रुंगारे, दौलतराव कदम, महिला वितरक वंदना लोणे,यांच्या सह विक्रेते व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार दिगंबर शिंदे,तिरूपती पाटील घोगरे, छायाचित्रकार सांरग नेरलकर यांच्या सत्कार करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर शिंदे तर आभार सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सतिश कदम यांनी मानले, वर्धापनदिन निमित्ताने शेड येथे फुलांची सजावट, रांगोळी, रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी ते साठी सचिव बालाजी सुताडे, तातेराव वाघमारे, शुभम कुंभार, गणेश ठाकूर,माधव कांबळे, राजु चव्हाण, अनिल सुताडे यांच्या सह वृत्तपत्र विक्रेता यांनी परिश्रम घेतले.
