नांदेडमनोरंजन

बालनाट्य स्पर्धा जल्लोषात संपन्न; एकापेक्षा एक दर्जेदार नाटकाचे सादरीकरण

नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे बुधवार दिनांक १० जानेवारी ते ११ जानेवारी या दोन दिवसात कुसुम सभागृह येथे संपन्न झाली या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ११ संघांनी उत्तम सादरीकरण केले..

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी केंब्रीज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने “मिसिंग”, बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने “सक्सेस अॅप”, ज्ञानभारती विद्यामंदिर, नांदेडच्या वतीने “बुद्धाची गोष्ट”, जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर, जिंतूरच्या वतीने “मदर्स डे” नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णीच्या वतीने “जड झाले ओझे” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.

तर स्पर्धेच्या दुसर्या दिवशी दिनांक ११ जानेवारी रोजी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने “एलियन्स द ग्रेट”, राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविध्यालय, धर्माबादच्या वतीने “चिऊताई माझ्याशी बोल ना”, शाकुंतल स्कूल फॉर एक्सलंस, नंदेच्या वतीने “वडाळा ब्रिज”, टायनी एंजल्स स्कूल, नांदेडच्या वतीने “करामती पोर”, राजीव गांधी युवा फोरम,

परभणीच्या वतीने “जगण्याचा खो” आणि जिल्ह्य परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, परभणीच्या वतीने “गोष्टीची गोष्ट” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेस समन्वयक म्हणून दिनेश कवडे यांनी काम पाहिले तर सह समन्वयक म्हणून किरण टाकळे, सुधांशू सामलेट्टी, शेजल क्रीप्लानी, प्राजक्ता बोचकरी, शांती देसाई, सपना वाघमारे यांनी काम पाहिले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!