आता वाढोणा शहरातील वरद विनायक गणपतीचा अभिषेक वर्षातील 365 दिवस होणार

हिमायतनगर,परमेश्वर काळे| (वाढोणा) शहरापासून हाकेच्या अंतरावर पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक व श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापनेला अनेक वर्षे झाली, मंदिराचे सौंदर्य वाढविण्याचे काम समितीतर्फे सुरू आहे. त्यामुळे मंदिराची कीर्ती दिवसेंदिवस वाढत आहे. संकष्ट चतुर्थी, अंगारिका चतुर्थी या दिवशी भाविक दर्शनासाठी येतात तसेच गणेश भक्त दररोज दर्शनासाठी येऊन इच्छा व्यक्त करून दर्शन घेतात, ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशा भाविकांकडून चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
वाढोणा शहरात वसलेल्या वरद विनायकाच्या मूर्ती त्या काळात तब्बल दीडशे वर्षा त्याच अवस्थेत कडुनिंबाच्या झाडाखाली उष्मा, वारा आणि पाऊसचा अनुभव घेत राहिली. 1978 साली तत्कालीन अवतारपुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज हिमायतनगर शहरात आले होते. त्यावेळी कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत ग्रामस्थांना त्यांनी सूचना दिलली, त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकऱ्यांनी श्रमदान केले. गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर यांच्या पुढाकाराने मंदिराचे बांधकाम सुरू झाले. हा उद्देश यशस्वी करण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या तरुणांनी गणेशोत्सव कालावधीतील अनधिकृत खर्च टाळून व श्रमदानातून वरद विनायकाचे मंदिर उभारले. अष्टभुजधारी मनोकामना पूर्ण करणारी वरद विनायकाची एक मोठी मूर्ती मोठ्या कष्टाने उंचावर जेसीबीच्या साहाय्याने नेण्यात आली आणि एका उंच टेकडीवर असलेल्या मंदिरात विधीपूर्वक स्थापित करण्यात आली. आज ही मूर्ती सर्वांना आशीर्वाद देत असून गणेश उत्सवाच्या काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा – महाभिषेक, महाप्रसाद केला जातो.
यंदा चतुर्थीला वर्षभर अन्नदान अभिषेकचे आरक्षण समितीने केले असले तरी यापुढे अनेक वरद विनायक गणेशभक्तांना अभिषेक व दर्शनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत होते. याची जाणीव ठेवून येथील मंदिर समितीने वरद विनायक मंदिरात त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी आता वर्षातील ३६५ दिवस गणपती बाप्पाला अभिषेक व पूजा करण्याचे नियोजन करण्याच आयोजीत केले आहे. या निर्णयामुळे अभिषेक आणि पूजा करण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांना गणपती बाप्पाला अभिषेक आणि पूजा करण्याची संधी मिळणार आहे.
मंदिर समितीने गणेशभक्तांना विनंती केली आहे की, जर कोणाला वरद विनायक गणपती बाप्पाची अभिषेक पूजन करायचे असेल तर त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गणपती बाप्पा मंदिर समितीकडे नामनिर्देशन करावे त्या तारखेला त्या भक्तांचा अभिषेक नोंदवला जाईल आणि त्यांना वरद विनायक गणपतीची आरती, अभिषेक पूजा करण्याचे सौभाग्य मिळेल. ज्यांनी नोंद केली त्यांचं अभिषेक व पूजा होईल असेही समितीने कळविले आहे.
