नायगाव, रामप्रसाद चन्नावार| आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा हुस्सा ता.नायगाव येथे नामफलकाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
नायगाव तालुक्यातील हुस्सा ता. नायगाव येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.24 डिसे.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या व प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव जाधव सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल जि.प्र ऊपप्रमुख अशोकराव वाघमारे ,संस्थेचे सदस्य श्री प्रवीण रौतुलवाड,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर ,श्री त्रिमुख पा.येडके, यांच्या ऊपस्थित दिप प्रज्वलन करून बोर्डाचे अनावरन भगवंताच्या नामघोषनेत ऊत्साहात झाले.व प्रमुख पाहुण्याचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ता. अध्यक्ष सोपान गिरे यांनी केले. सुत्रसंचलन जिल्हाप्रसिध्दी ऊपप्रमुख अशोक वाघमारे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज यांनी आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होण्यासाठी साधु संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग हाच खरा मार्ग आहे आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्ती आणि जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचाआहे म्हणून अशा महान प्रसंगी धर्माचे रक्षण करण्यासाठी गाव तिथे आम्ही वारकरी परिवाराची शाखा स्थापन करून भक्तीमार्गासाठि ईश्वर सेवेची आवड निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत देऊन पारायण आपल्या वेळेनुसार घरोघरी व्हावे म्हणुन महाराष्ट्रात सहा वर्षापुर्वी 42 भक्तानां आज सात हजार पाचशे भक्त जोडण्याचे काम संस्थेने केले, तर भविष्यात पांडुरंग माऊलींच्या दरबारी पंढरपुर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची धर्मशाळा व्हावी म्हणुन जमीन खरेदीसाठी सर्वांनी मदत करून संघटितपणे धर्मरक्षणासाठी संस्थेत सहभागी होण्याचे अव्हाहन संस्थापक अध्यक्ष ह भ प पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांनी केले.
अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मनोगत व्यक्त केले. नायगाव तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती होते. हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठिआम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पाटील गिरे ता.ऊप अध्यक्ष शंकर आखले ता.सचिव बालासाहेब यरबडे, पपु पा कदम,शिवाजी कदम,सदस्य सुर्यकांत पांडे,मोहन मावले,संतोष पा.कदम,अशोक वाघमारे जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख प्रकाश वाघमारे,व हुस्सा येथील शाखा अध्यक्ष श्री महादेवराव तुकाराम वाघमारे, प्रकाश वाघमारे, शंकर वाघमारे,किशोर वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी झाले होते. असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.