हिमायतनगर तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला ; पैनगंगा कोरडी पडल्याने शहरांसह ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/04/jalkillat10.jpg)
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला असून, उन्हाच्या दाहकतने जीवसृष्टी प्रभावित झाली आहे. मार्च एन्डच्या शेवटच्या टप्प्यात आणि एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्याने शहरांसह ग्रामीण भागातही पाणीटंचाईच्या झळा अधिक तिव्रतेने जाणवत आहेत. दुपारच्या वेळी रस्ते निर्मूष्य जाणवत असून बाजारपेठेतील नागरिकांची रेलचेल मंदावली आहे. दरम्यान दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी रिमझिम पाऊस झाल्याने उष्णतेच्या झळा अधिक तीव्र झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हिमायतनगर शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा निर्माण करण्याकरिता शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी नळ योजना मंजूर झाली. परंतू कामाला कसल्याच प्रकारची गती नसल्याने अजूनही शहराला पाणी मिळाले नाही, विषेश करूण काम सुरू होवून पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. संबंधित कामाचे ठेकेदार हे प्रशासकीय यंत्रणेला मॅनेज करून कितीही दिवस काम चालूच ठेवत आहेत. सुधारित पद्धतीने मूल्यांकन करून निधी मात्र मोठ्याप्रमाणात लाटला जात असल्याचे सांगण्यात येते. शहराची सार्वजनिक नळ योजना भ्रष्टाचारात अडकली आणी आता ग्रामीण भागातही हे लोन पसरले आहे. तालुक्यात जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे चालू आहेत. परंतू कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने मिळालेल्या योजनेचे फलित होतांना मात्र दिसत नाही.
अनेक गावांच्या नळ योजना अर्धवट अवस्थेत आहेत. हिमायतनगरला पाईपलाईन करणाऱ्यांसाठी जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खोदकाम करण्यात आले आहेत. परंतू खोदलेल्या रस्त्यावर कोणी एक टोपलं मुरूम टाकत नाहीत. तर खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्यावर रोजच किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहेत. आता पावसाळा दोन अडीच महिन्यावर येवून ठेपला आहे. आणी इकडे लोकसभा निवडणूकीची धुम सुरू आहे. अश्या अवस्थेत रस्ते या वर्षीच्या उन्हाळ्यात पुर्ण होतील असे सांगता येणार नाही. सद्यस्थितीत उन्हाची दाहकता कित्येक पट्टीने वाढली आहे. नागरिक सकाळी सकाळी कामे आटोपून घेत आहेत. आणी सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी झाल्यानंतर बाहेर पडत आहेत. शहरांच्या अगदी नजीकहून वाहणारी पैनगंगा नदीही कोरडी पडली आहे त्यामुळे अनेक गावाच्या नळयोजना पाणी नसल्याने बंद पडल्या आहेत. परिणामी पाणीटंचाई च्या झळा मोठ्याप्रमाणात जाणवत आहेत. हि बाब लक्षात घेता इस्पीत धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक वर्गातून केली जात आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. नागरिकांनी उन्हात जावू नये, शक्यतोवर सकाळीच कामे आटोपून घ्यावेत, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, अगदीच आवश्यक असल्यास बाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधावा, उन्हातून आल्यानंतर टप्प्या टप्प्याने थोडा वेळ थांबून पाणी प्यावे, उन्हात जाणे शक्यतोवर टाळत जावे अश्या प्रकार उन्हात काळजी घयावी असं आवाहन डाॅ. वैभव नखाते वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र सरसम बु. ता. हिमायतनगर यांनी केला आहे.
हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाणी टंचाईच्या झळा
शहराची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली नसल्याने शहरात पाणी त्यांची वाढली आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, याच बरोबर ग्रामदिन रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागराईक व नातेवाईकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. येथे पाण्याची कोणतीच सोया नसल्यामुळे नगरपंचायतीने देखील रुग्णालयाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. हि बाब लक्षात घेता सामाजिक संघटनानॆ येथील रुग्नालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांसह नातेवाईकांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)