प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती
नांदेड| प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानतर्गत “हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 23 जानेवारी 2024 रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे “हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान” राबविण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व विदयार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येवून त्यांना माहिती पत्रके व माहिती पुस्तिकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळीचे अध्यक्ष देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, बिलोलीचे पोलीस निरीक्षक सोडारे, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे, प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथील वैद्यकीय अधिकारी पांडूरंग पावडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास 100 नागरिक, 50 विदयार्थी, 45 वाहनचालक उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ सुमारे 130 वाहनधारकांनी व नागरिकांनी घेतला. या नेत्र तपासणी शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कुलकर्णी यांनी तपासणी केली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत उपस्थित असलेल्या नागरिकांची प्रश्न मंजुषा घेण्यात येवून यामध्ये विजेत्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सगरोळी येथील नागरिकांना हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियानाचीची शपथ देण्यात आ ली. यावेळी हिरो व बजाज कंपनीच्या वाहन वितरकांच्या मार्फत दुचाकी चालवितांना घ्यावयाची काळजीबाबत माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक किशोर भोसले व सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय भोसले यांनी परिश्रम घेतले.