नांदेड| राज्यभरातील तांड्यांवर असलेल्या मंदिरांची स्वच्छता आणि त्या ठिकाणी भजनसंधेचे आयोजन करण्याची मोहीम सर्वत्र सुरू करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश वस्ती तांडा संपर्क अभियानाचे संयोजक डॉ. मोहन चव्हाण यांनी दिली.
येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील तांड्यांवर असलेल्या सर्व मंदिरांची साफसफाई करणे, तेथे पताका ,दिवे लावणे,रांगोळी काढणे आणि भजनसंधेचे आयोजन करणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे. डॉ. मोहन चव्हाण यांचा प्रदेशातील प्रत्येक तांडा – वस्ती भागात असलेला प्रत्यक्ष जनसंपर्क यामुळे या मोहिमेला मोठा प्रतिसाद आणि गती मिळत आहे.