वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्याचं कामात अनियमित; स्टील न वापरता डस्टमध्ये काम केल्याने बोगस कामाची पोलखोल
हिमायतनगर| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक अंतर्गत रस्त्यावर वाशी गावाजवळ सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या कामात स्टील वापरणे अनिवार्य होते. परंतू ठेकेदारांनी तसे न करता नुसते सिमेंट काँक्रीटचे थातुर माथूर तेही अत्यल्प मटेरियलचा वापर करूण काम पुर्ण केले आहे. या कामाबाबत असंख्य तक्रारी होवूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्ता कामाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन उपअभियंत्याकडून ठेकेदारचे देयके काढण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे तक्रारकर्ते दत्ता शिराणे हे आमरण उपोषण करण्याच्या मार्गावर आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून ५ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. आणी या कामाची प्रत्यक्षात सुरूवात झाली ठेकेदाराने दिलेल्या मुदतीपूर्वी रस्त्याचे काम थातुर माथूर केले. काम सुरु असताना वाशी येथील काहींनी काम थांबविले होते, तर एकाबाजूने रस्ता करताना ये जा करताना अनेक वाहने खड्ड्यात अडकून पडली होती. ग्रामस्थांनी व वाहनचालकांची ओरड पाहून ठेकेदाराने रस्त्याचे काम झटपट उरकण्यासाठी चक्क दत्तचा वापर करून काम उरकून घेतले. भर उन्हाळ्यात करण्यात आलेल्या गावाजवळील सिमेंट रस्त्याची म्हणावी तहसी क्युरिंग झाली नसल्याने आजघडीला सिमेंट काँक्रेट रत्स्याची वाट लागली तर अनेक ठिकाणी उखडू लागला आहे.
तसे पहिला डांबरी रस्ता उखडून त्याचेवर मुरूम अंथरून पाणी टाकून मजबुतीकरण करणे गरजेचे होते. परंतू ठेकेदाराने पहिल्याच खराब डांबरी रस्त्यावर फक्त चार इंची डांबराचा लियर अंथरून उपअभियंता तुंगेवर यांच्या संगनमताने अतिशय थातूरमातूर पद्धतीने काम उरकून घेतले आहे. तसेच वाशी गावाजवळ सिमेंट रस्त्यावर स्टील वापरणे गरजेचे अर्थात शासनाच्या मुळ अंदाज पत्रकात तश्या स्वरूपाची तरतूद आहे. परंतू ठेकेदाराने मनमानी पध्दतीने अतिशय बोगस व थातूरमातूर पद्धतीने काम उरकण्यात आले आहे. या बोगस कामाची शाखा अभियंता व उप अभियंता मायेच्या लालसेपोटी सुधारीत मूल्यांकन करून बोगस बिले लाटण्याच्या तयारीत आहेत.
अश्या स्वरूपाची तक्रार भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्याकडे निवेदन देऊन भाजपचे अनू जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी चौकशीची मागणी केली होती. परंतू अद्यापपर्यंत कारवाई गुलदस्त्यात ठेऊन रस्ता चांगला असल्याचे दाखवून देयके अडा करण्यासाठी राजकीय पुढाऱ्याच्या मदतीने हालचाली सुरु केल्या आहेत. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रारदारसमोर सखोल चौकशी करून ठेकेदार व दोषी अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी. त्यानंतरचा कामाचे देयके अडा करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याच्या तयारीत तक्रारकर्ते दत्ता शिराणे यांनी सांगितले आहे.