नांदेड। जिल्हयातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून एक व्यक्ती कॉल करून हॅरेसमेंट करून खंडणीची मागणी करीत होता. त्यानंतर सदर व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, एक व्यक्ती वेगवेगळया क्रमांकावरून कॉल करून खंडणीची मागणी करीत होता. तक्रार दिल्यानंतर सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड आणि मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
सदर मोबाईल क्रमाकांचे तांत्रीक विश्लेषण केल्या नंतर सदर मोबाईल क्रमांक हे सिमबॉक्सचा वापर करून व्हीओआयपी कॉलद्वारे कॉल करीत होते व सदर सिमबॉक्स मध्ये प्रिपेड कार्डचे वापर करण्यात आले असून सखोल तपास केला असता त्या सीमबॉक्सचे लोकेशन कर्नाटक राज्यातील दांडेली येथे मिळून आले. आरोपी क्र. 1) सियाबुध्दीन पि. अब्दुलरहेमान, 2) जयेश अशोक बेटकर, दोघे रा. दांडेली ता. दांडेली जि. कारवार राज्य कर्नाटक 3) राशिद आब्दुल अजिज नोटटानवीडन रा. कटाडी मोतेडम पोस्ट ईडडककरा ता. निलंबुर जि. मल्लपुरम, राज्य केरळ हे निष्पन्न झाले असुन या तिघांनाही नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी यांच्याकडुन दहा सिमबॉक्स व 1244 सिमकार्ड, पाच राऊटर, लॅपटॉप व इतर साहित्य हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी हे एअरटेल कंपणीचे सिमकार्डचा वापर करून अंतराष्ट्रीय कॉल अॅप / सॉप्टवेअरद्वारे व्हीओआयीपीचे जीएसएम मध्ये रूपांतर करून स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी वापर करीत होते. सदर आरोपी हे इतक्या मोठया प्रमाणात सिमकार्ड का वापरत होते या दृष्टीकोणातून तपास चालू आहे.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, मा. श्री मारोती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार मा. श्री. द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा मा. श्री. उदय खंडेराय, पोनि पोस्टे कंधार यांचे मार्गदर्शनाखाली श्री चंद्रकांत पवार, सपोनि पोस्टे लिंबगाव, श्री अदित्य लोणीकर, सपोनि पोस्टे कंधार, श्री राजेश अलीवार, सपोनि अर्थीक गुन्हे शाखा, श्री राम केंद्रे, सपोनि पोस्टे वजिराबाद, श्री दशरथ आडे, पोउपनि श्री दत्तात्रय काळे, स्थागुशा, श्री गजानन दळवी, पोस्टे सायबर, पोना / प्रकाश टाकरस, पोकॉ / नदीम डांगे, पोस्टे कंधार तसेच स्थागुशा, विशेष पथक, सायबर सेल, पोस्टे वजिराबाद, कंधार येथील अमंलदार यांनी संयुक्तीक कार्यवाही केली आहे. नांदेड जिल्हयातील नागरीकांना असे कोणतेही धमकीचे कॉल आल्यास पोलीसांशी संपर्क साधाण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी केले आहे.