
नवीन नांदेड। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेत सिडको, नांदेड येथील जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्रातील विद्यार्थी सुधाकर दर्शने यांनी प्रथम, तर संबोधी शिवाजी राजूरकर यांनी तृतीय येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नांदेड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत सिडको, नांदेड येथील जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी सुधाकर शिवाजी दर्शने यांनी प्रथम क्रमांक, तर संबोधी शिवाजीराव राजूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सुधाकर दर्शने व संबोधी राजूरकर यांच्या या यशाबद्दल जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर यांनी सुधाकर दर्शने तसेच संबोधी राजूरकर यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. निरंजनकौर सरदार,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. दिलीप काठोडे, प्रा.डॉ.एन.जी. पाटील, प्रा.डॉ.मनीषा मांजरमकर, प्रा.डॉ.मेघराज कपूरडेरिया, प्रा.डॉ. विद्याधर रेड्डी, प्रा.डॉ.प्रतिभा लोखंडे, प्रा.डॉ.सत्वशीला वरगंटे, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, प्रा.सुनील गोईनवाड, प्रा. गोपाल बडगिरे, प्रा.डॉ.अंबादास कर्डिले, प्रा सुनील राठोड, प्रा.डॉ.ए. ए. शेख, राजेश पाळेकर, संतोष मोरे, नरेंद्र राठोड, सुनील कंधारकर, गणेश तेलंग व मोहन स्वामी आदींनी उपरोक्त निबंध स्पर्धेत प्रथम व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सुधाकर दर्शने व संबोधी राजूरकर यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
