नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गटाचे) नांदेड उत्तरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजि. विश्वाभंर पवार यांचा वाढदिवस त्यांनी स्वतःच शिबीरात रक्तदान करण्यासह भोकर तालुक्यातील सर्वच शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप,शेतकऱ्यांच्या कुटूबियांना आर्थिक मदत आदी विविध उपक्रमांतून साजरा करण्यात आला.
इजि.विश्वांभर पवार यांनी गत अनेक वर्षांपासून समाजकारणातून राजकीय वाटचाल करतांनाच दरवर्षी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करतात यंदाचा वाढदिवस त्यांच्या कार्याची मिळालेली पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे नुकतेच मिळालेले सदस्यपद यामूळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य घडविणारा असला तरिही अन्य बाबींना दूर सारित पवारांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जोपासीत आपला वाढदिवस साजरा केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे,युवक चे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,लोहा-कंधारचे आ. शामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा समाजसेविका आशाताई श्यामसुंदर शिंदे, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी दत्तात्रय पाटील गौड,उद्योजक गणराज सादूलदार,देवा हटकर,प्रसिध्द कापड व्यापारी कल्पेश रायपत्रेवार युवानेते गणेश बोलेवार आदींसह राज्यातील अनेकांनी प्रत्यक्ष वा भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इंजि.पवार यांना जन्मदिनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट ) भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी भोकर तालुक्यातील सर्व शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.शहरातील नूतन शाळेत इंजि. विश्वाभंर पवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.इंजि पवार हे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवी भावनेने दरवर्षी गरजू शेतकऱ्यांची ते आर्थिक स्वरूपात मदत करतात यावर्षीही त्यांनी पोमनाळा व जामदरी येथील दोन शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे भोकर तालुका अध्यक्ष युवा नेते राजेश्वर देशमुख यांनी राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आतिशबाजी व ढोल ताशांच्या गजरात केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव देशमुख,चेअरमन सोसायटी भोकर, जिल्हा उपाध्यक्ष पंकज देशमुख भोसीकर, ओबीसीचे जिल्हाधक्ष आंनद डांगे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रतीक कदम,जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार,जिल्हा सरचिटणीस अहमदभाई करखेलीकर,जिल्हा चिटणीस सिद्धेश्वर पाटील चिंचाळकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,सेवा दल जिल्हाध्यक्ष गाढे,युवा नेते आनंद पाटील सिंधीकर,जिल्हा संघटक सतीश पाटील मातुळकर, जिल्हा सदस्य विजय पाटील सोळंके, जिल्हा सदस्य गणेश चंपतराव देशमुख, जिल्हा सदस्य सतीश चाटलवार,मुदखेड तालुकाध्यक्ष आनंदराव टिप्परसे,
हिमायतनगर तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे,सोशियल मीडिया तालुकाध्यक्ष सचिन सुंकळेकर, ॲड. सलीम शेख,युवानेते एजास कुरेशी,शेख जब्बारभाई, ओ.बि.सी. नेते तुकाराम महादावाड,युवा कार्यकर्ते मोहम्मद मझरोद्दीन ,तालुका सचिव महेंद्र निवृत्तीराव कांबळे, तालुका उपाध्यक्ष-राजू ब्रम्हया पांचाळ, विलास तुळशीराम गुंडेराव, दिनकर रामदास जाधव, गजानन देवीदासराव सोळंके, तालुका सरचिटणीस-महेंद्र अर्जुनराव दुधारे,दशरथ मारोती इंदरवाड, साहेबराव प्रकाशराव वाहूळकर, तालुका सहसचिव-संजय दत्ता बनसोडे,तालुका सल्लागार- बालाजीराव किशनराव देशमुख,मिठू होबा राठोड यांच्यासह जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व मित्रपरिवार हितचिंतकांकडून बहुसंख्येने उपस्थित राहून इंजि.पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.