नांदेड/मुखेड| पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित मा.श्री.नारायण काळबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मा. श्री संभाजी भुजंगराव गोंडाळे यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. कवयित्री पंचवटी संभाजी गोंडाळे लिखित काजवा एक संघर्ष कथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे भूषविणार असून आ.डॉ. तुषार गोविंदराव राठोड उदघाटक तर मा.आ. जितेश भाऊ अंतापुरकर स्वागताध्यक्ष असणार आहे.
या सोहळ्यात जगन्नाथ लकडे, राजेश जाधव, खुशालराव पाटील उमरदरीकर, मा. व्यंकटराव लोहबंदे, मा. गौतमजी काळे, रमेश वाघ, डॉ. मनोहर तोटरे, मा. धनंजय कोडगिरे, व्यंकटराव पा. गवते, मा. शंकर पा. लुट्टे, नारायण पा. जाधव, मरीबा घोरपडे, गणपत घोरपडे, पंकज गायकवाड, बोबडे नागोराव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून भैरवनाथ कानडे, भालचंद्र नाईक, गुलाबराजा फुलमाळी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभणार आहेत. नारायण काळबा गायकवाड, व जयश्रीताई गायकवाड यांचा नागरी सत्कार होणार आहे.
या सोहळ्याच्या दुस-या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे या सत्रात मा.पार्थ नारायण गायकवाड हे स्वागताध्यक्षपदी असून भैरवनाथ कानडे, महेश लांडगे, राणी चोपडे, सत्येंद्र राऊत, विलास शिंदगीकर, रजनी कुलकर्णी, रज्जाक शेख, रविंद्र गिमोणकर, सौ. केराबाई गायकवाड, अनिता गायकवाड आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीचे मा. संभाजी गोंडाळे व मा. पंचवटी संभाजी गोंडाळे व कोअर कमिटीने केले आहे.