ठाणे| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी बाबामहाराज यांच्या नेरुळ येथील निवासस्थानी भेट देऊन श्री. सातारकर यांची मुलगी, नातू यासह सातारकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे जाणे, ही अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आहे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. आध्यात्मिक प्रचाराबरोबरच समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी केले. आध्यात्मिक मार्गातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होईल, त्यांचे दुःख कमी कसे होईल, हे त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितले. आपल्या अमोघ वाणी व कीर्तनातून त्यांनी राज्याबरोबरच देशविदेशातील नागरिकांना जवळ केले होते.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version