नांदेड| सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती श्री. रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे कुलपती श्री. रमेश बैस यांनी नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वीकारावा, असा आदेश काढलेला आहे. दि. ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत डॉ. प्रकाश महानवर हे नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार पाहतील असे आदेशात म्हटले आहे. माननीय कुलपती श्री. रमेश बैस यांनी दिलेली जबाबदारी निश्चितच समर्थपणे पार पाडेन, असे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी म्हटले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version