नांदेड। मराठा समाजच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमेश्वर ता. नांदेड येथे सोमवार दि. २५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतिने पत्रकार आनंदा बोकारे यांच्यासह महिला, नागरिकांचा आंदोलनामध्ये सहभाग आहे.

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवसाच्या उपोषणा नंतर मागणी मान्य होई पर्यंत साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाज पूर्वीपासूनच मागास प्रवर्गात असल्याचे पुरावे देत जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाचा कालावधी दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळास भेट देवून जरांगे पाटलांना एक महिण्याचा वेळ मागत लिंबू शरबत देवून उपोषण सोडले होते.

पण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगे पाटील यांनी दहा दिवसाचा अतिरिक्त वेळ देत सरकारला एकून चाळीस दिवसाचा वेळ दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठींबा वाढत आहे. मराठा आरक्षण लढा व्यापक होत असून सरकारने वेळेच्य आत आरक्षणाची आंमलबजावणी करून सकल मराठा समाजाची मागणी मान्य करावी, राज्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसह मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमेश्वर येथे सकल मराठा समाजाच्या वतिने आनंदा बोकारे पत्रकार यांनी सोमवार दि. २५ पासून सोमेश्वर मंदिरा समोर साखळी उपोषण सुरू केले आहे.

पत्रकार आनंद बोकारे यांच्यासह गिरीजाबाई बोकारे, शांतबाई बोकारे, गयाबाई बोकारे, प्रयागाबाई बोकारे, सिताबाई बोकारे, सुमित्राबाई बोकारे, जनाबाई बोकारे, मथुराबाई बोकोर, सुमनबाई बोकारे, चंद्रकलाबाई बोकारे, प्रभावतीबाई बोकारे, सागरबाई बोकारे, वैजंताबाई बोकारे, लक्ष्मीबाई बोकारे, रेखबाई बोकारे, किसनाबाई बोकारे, नंदाबाई बोकारे, गणेश बोकारे, डिगांबर बोकारे, ओंकार बोकारे, विलास बोकारे, विष्णू बोकारे, कैलास बोकारे, तुकाराम बोकारे, चांदू बोकारे, सोपान बोकारे, नामदेव बोकारे, गजानन बोकारे, पांडूरंग बोकारे यांच्या सह नागरिक सहभागी आहेत. बुधवारी दि. २७ तालुका प्रशासनाचे नायबतहसीलदार काशीनाथ डांगे, मंडळअधिकारी कुणाल जगताप, तलाठी विजय रनवीरकर, अनिल मुनेश्वर यांनी भेट देवून आंदोलनकांशी चर्चा केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version