उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे भुकमारी ता.कंधार येथील मागासवर्गीय वस्तीतील सीसी रस्त्याचे काम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.पण हे काम सदरील ठेकेदार नियमानुसार व दर्जेदार न करता थातुरमातुर ( थुकापालीस) चे काम उरकून बिल उचलण्याचा सपाटा चालविला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकारी प.स.कंधार यांच्या कडे दिलेल्या निवेदनाद्वारे कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मौजे भुकमारी ता.कंधार येथे दलित वस्तीत सीसी रस्त्याचे काम करण्यात आले असून ते काम योग्य त्या ठिकाणी न करता अनआवश्यक ठिकाणी करत निकृष्ट दर्जाचे काम करून शासनास लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंच यांनी करीत असलेल्या दलित वस्तीच्या कामाचे त्वरित चौकशी करावी असे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार यांना दिले आहे.

भुकमारी ता. कंधार येथील दलित वस्तीत सीसी रस्त्याचे काम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे परंतु हे काम नियमाप्रमाणे व दर्जेदार न करता थातूरमातुर काम करून बिल उचलण्याचा सपाटा ग्रामपंचायत मार्फत चालू केला आहे या कामामध्ये योग्य सिमेंट चा वापर केला नाही दर्जेदार सिमेंट वापरण्यात आले नाही आणि अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले नाही त्यामुळे कामाचा दर्जा खालवला आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सांगनमत करून थातूरमातुर काम केले आहे तरी या कामाची बाह्ययंत्रनेमार्फत चौकशी करून संबंधित व्यक्ति वर अट्रयसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा असेही या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर राजरत्न पवार, अरुण मोरे राहणार भुकमारी या दोघांच्या स्वाक्षऱ्या असून त्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड देण्यात आल्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version