नांदेड| शासन निर्णयानुसार दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रती लिटर 5 रूपये अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावशक आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व पशुपालक / शेतकरी यांनी आपल्या सर्व पशुधनास टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजकुमार पडिले यांनी केले आहे.

पशुधनास टॅगिंग व नोंदणी शेतकरी / पशुपालक यांच्याकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत असून आज अखेर पुढीलप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या. पशुधन नोंदणी 5.73 लक्ष, पशुपालक नोंदणी 1.96 लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी 3.20 लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल 1.84 लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी (टॅग बदल) -5 हजार 795, पशुपालकांच्या नावातील बदल 0.50 लक्ष. तसेच अतिरिक्त 56 लक्ष टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविण्याबाबत शासन स्तरावरुन सूचित केले आहे.

गुरांचा चारा, गवत, वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी


नांदेड जिल्ह्यात सन 2023 च्या पावसाळयात सरासरीपेक्षा अल्प पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातून गुरांचा चारा, गवत, वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version