नांदेड| महाविजय 2024 ची महा तयारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे . त्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेड येथे आज 100 वॉरियर्स बैठक घेण्यात आली. याचवेळी मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन करणाऱ्या आ. तुषार राठोड यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुक हंबर्डे यांनी सत्कार केला.

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात भाजपाची सत्ता येणार आहे. मात्र महाराष्ट्रात 44 प्लस हे लक्ष ठेवण्यात आले असून या लक्षाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत भाजपाचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली विकास कामे पोहोचविण्यात येत आहेत. प्रत्येक बूथ वर वॉरियर्स नियुक्त करण्यात आले आहेत . मुखेड विधानसभा मतदारसंघातही वॉरियर्स नियुक्त करण्यात आले असून १०० वॉरिअरच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते.

जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस आमदार डॉ तुषारजी राठोड, भाजपा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठाकरवाड, डॉ माधवराव पाटील उच्चेकर, खुशाल पाटील उमरदरीकर, हानमंतराव नरोटे, बालाजीराव सावळीकर, अशोकराव गजंलवाड, सौ. आनिताताई चौडीकर, सौ. राजश्रीताई राठोड, डॉ शारदाताई हिंगमिरे, व्यंकटराव पाटील चांडोळकर, डॉ. वीरभद्र हिंगमिरे, दत्ता पाटील बेटमोगरेकर, किशोरसिंह चव्हाण, संभाजीराव शेळके, संदीप पाटील रामपुरे, राजू घोडके, पंजाबराव पाटील वडजे, संग्राम आप्पा मळगे, व्यंकट लोहबंदे, नारायण गायकवाड, गजू साखरे, संगमेश्वर देवकते, संजय सिंग देवकते, करण रोडगे,व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नुकत्याच झालेल्या मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. तुषार राठोड यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध करत येथे काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांचा दारुण पराभव केला . त्यामुळे या विजयाचे शिल्पकार ठरलेले आ. राठोड यांचा आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी सत्कार केला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version